Advertisement

पिंपळगाव् (हरे) :  रोटरी क्लब कडून मूकबधिर निवासी विद्यालयात दिव्यांगांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम

पिंपळगाव् (हरे) :  रोटरी क्लब कडून मूकबधिर निवासी विद्यालयात दिव्यांगांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम

पिंपळगाव (हरे) :  रोटरी क्लब पाचोरा भडगाव,पाचोरा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडून मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे येथे दिव्यांगासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी तालुका विधी सेवा समिती सदस्य व रोटरी क्लब पाचोरा भडगाव पदाधिकारी यासोबत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना, रोटरी क्लब सचिव डॉ अजयसिंग परदेशी यांनी रोटरीचे पोलिओ निर्मूलना मधील योगदान,पाचोरा तालुका विधी सेवा समिती जेष्ठ मार्गदर्शन प्रकाश विसपुते सर यांनी पॉकसो कायदा मार्गदर्शन,प्रा राजेंद्र देशमुख सर यांनी शिक्षणाचा अधिकार यावर,रोटरी सदस्य संजय कोतकर यांनी रोटरीच्या समाजकार्याबद्दल,पाचोरा तालुका विधी सेवा समिती सदस्य व रोटरी सदस्य डॉ प्रशांत सांगडे यांनी विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच व सकस आहार यावर मार्गदर्शन केले.यावेळी शाळेचे संचालक संजय पाटील, देशमुख सर, मुख्याध्यापक ईश्वर पाटील, शाळेचे शिक्षक नितीन पाटील, संदेश शहा, प्रताप इंगळे यासोबत शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक,पालक व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण सूर्यवंशी यांनी केले.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!