Advertisement

नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा; वृक्षारोपणासह शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप


मिरजेतील प्रभाग चार च्या नगरसेविका सौ अपर्णा विवेक (बंडू) शेटे यांचा वाढदिवस यंदा खास होता कारणही तसेच होते, महापालिकेच्या सभागृहातील शेटे परिवारातील त्यांचे नगरसेविका म्हणून नुकतेच पहिले पाऊल पडले आणि दुहेरी योग असा कि सांगली आणि सातारा स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतील त्यांचे भाजप च्या नगरसेविका या नात्याने पहिलेच मतदान. पक्षाच्या आदेशाप्रमाणे त्या गोव्याला ट्रिप ला गेल्या नाहीत कारण त्यांच्या सासू आजारी होत्या त्यांच्या देखभालीची एक कुटुंबवत्सल स्नुषा म्हणून असलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि कर्तव्य म्हणून पक्ष श्रेष्ठीना सांगितल्या प्रमाणे त्यांनी मतदानाच्या आधी एक दिवस कोल्हापूर ला जाणे अधिक पसंद केले. पती उद्योजक विवेक शेटे यांच्यासह त्यांनी कोल्हापूर गाठले मात्र मिरजेतील त्यांच्या वाढदिवसाची तयारी मात्र त्यांच्या मित्र परिवाराने चांगली सांभाळली. त्यांच्या कुटुंबातील उदयोजक आशिष शेटे आणि त्यांचे सुपुत्र अथर्व शेटे यांनी वाढदिवसाला विविध सामाजिक उपक्रम रावबवून खऱ्या अर्थाने सौ अपर्णा शेटे यांचा वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी योग्य आणि चांगले संयोजन केले. नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेटे यांना शिक्षणाची तसेच पर्यावरणाची विशेष आवड असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचा संच वाटप करण्याची कल्पना तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण हि संकल्पना त्यांनी आपले पती विवेक शेटे यांच्या बरोबर व्यक्त केली तात्काळ उद्योजक विवेक शेटे यांनी त्यांच्या या मागणीला मंजुरी देत. शकडो वह्यांचे संच मागवून घेतले आणि बकूळबाग येथील रहिवासी संकुलातील मनपा च्या खुल्या भूखंडामध्ये वृक्ष लागवडीसाठी योजना आखली. दि १८ तारीख सकाळी नगरसेविका सौ अपर्णा शेटे यांनी आपला सांगली सातारा स्थानिक स्वराज संस्थेतील म्हणजेच सांगली मिरज संयुक्त विधानपरिषदेतील मतदानाचा हक्क बजावला आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवसाची सुरूवात केली. मिरज मधील बकुळबाग रहिवासी संकुलातील खुल्या भूखंडात विशेष वृक्षारोपण मोहीम आयोजित करून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली यावेळी मिरजेतील निसर्गप्रेमी सुधीर गोरे यांच्या सह युवा उद्योजक अथर्व विवेक शेटे आणि मित्रपरिवाराने वृक्षारोपण केले, सायंकाळी मिरज विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार आणि माजी मंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या सौभाग्यवती सौ सुमनताई खाडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेटे यांनी केक कापला यावेळी तनूबाई दगडू खाडे इंग्लिश स्कुल च्या संचालिका सौ स्वाती खाडे यांच्यासह नगरसेवक मोहन वाटवे, भाजप चे मिलिंद भिडे, पत्रकार सुभाष कपूर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत वह्यांचे संच वाटप करण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!