Advertisement

महापालिकेच्या वाढीव घरपट्टी नोटिसा; व्यापारी आणि नागरिकांमधून वाढला रोष

प्रतिनिधी सुधीर गोखले

सध्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील सध्या भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी वितरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अनेक मालमत्ताधारकांना प्रचंड दर वाढीच्या नोटीसा आल्या आहेत त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण होत आहे त्यातच या नोटिशीला २१ दिवसाच्या आत उत्तर द्यायचे आहे. या मर्यादित दिवसांमध्ये हरकती आणि अक्षेप नोंदवायचे असल्याने हि दिलेली मुदत तोकडी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याच बरोबर काही भागांमध्ये घरपट्टी वेळोवेळी भरूनही मूलभूत नागरी सुविधा पोचू शकल्या नसल्याने तेथील नागरिक या वाढीव घरपट्टी नोटिसींबाबत आक्रमक आहेत. काही मालमत्ताधारकांमध्ये घरपट्टीची नोटीस कमी दरामध्ये आली आहे त्यांना समाधान आहे मात्र काही मालमत्ताधारक प्रचंड वाढलेल्या दरामुळे अक्षरशः आक्रमक झाले आहेत. कार्पेट एरिया ऐवजी बिल्टअप एरिया वर घरपट्टी आकारणी केली गेली आहे. बिल्टअप एरिया मुळे घरपट्टी आकारणी क्षेत्र वाढले आहे. पर्यायाने घरपट्टी ची रक्कम देखील वाढली आहे. त्यामुळे कार्पेट एरिया हा घरपट्टी आकारणीस ग्राह्य धरण्याची मागणी मालमत्ताधारकांमधून होत आहे. घरपट्टी वाढीच्या तक्रारी आता नूतन नगरसेवकांकडे येत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!