Advertisement

वारणा धरणामध्ये केवळ १३.३३ टी एम सी पाणीसाठा; कोयनेचे पाणी पातळी आणखी खालावली; कोयना आणि वारणा धरणाचे नवे जलवर्ष आजपासून

प्रतिनिधी सुधीर गोखले

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले वारणा धरण अर्थात वसंत सागर जलाशयातील पाणी साठा आता १३.३३ टी एम सी इतका राहिला असून कोयना धरणातील पाणीसाठाही कमालीचा घटला आहे. पश्चिमेकडील कोयना विद्युत प्रकल्प बंद झाले आहेत. आज पासून चांदोली (वारणा) धरण आणि कोयना धरणाचे नवे जलवर्ष सुरु होत आहे. सध्या २०२६- २०२७ या जलवर्षाच्या सुरुवातीला चांदोली धरणातील पाणीसाठा आणि सुरु असलेली विद्युत निर्मिती हि एक चांगले सकारात्मक वातावरण तयार करत आहे. या धरणाच्या तांत्रिक वर्ष पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ मे अखेर धरक्षेत्रामध्ये १३.३३ टी एम सी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ६.४५ टी एम सी पाणीसाठा उपयुक्त मानला जातो. गतवर्षी हाच पाणीसाठा ६.८० टी एम सी इतका होता. या धरणाची एकूण क्षमता ३४.४० टी एम सी इतकी आहे. यामध्ये ७ टी एम सी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा असतो. आता मान्सून मधील कालावधी मध्ये हे धारण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी २१.७ टी एम सी इतक्या पाण्याची आवक या धरणामध्ये होणे गरजेचे आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दार वर्षी सरासरी ३ ते ५ हजार मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. २०२५-२०२६ या जल वर्षात ३०७७ मिमी पावसाची नोंद झाली होती या धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून २०२६-२०२७ शाळातील पहिल्या दोन महिन्यामध्ये ९.७४ दश लक्ष युनिट इतकी वीज निर्माण करण्याची कामगिरी केली आहे. यंदा संपूर्ण राज्यात अल निनो चा प्रभाव असून सरासरीपेक्षा पाऊसमान कमी होण्याचे वेधशाळेचा अंदाज आहे. त्यातच सध्या मान्सून चे आगमन आता १० जून नंतर होणार असल्याचे सांगितले गेले आहे. सध्या वाढत्या उन्हाळ्यामध्ये धरणातील पाण्याचे होणारे मोठ्या प्रमाणावरील बाष्पीभवन हि चिंतेची बाब आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!