सांगली-कोल्हापूर रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुरावस्था आणि प्रशासनाचे याकडे होणारे दुर्लक्ष याच्या निषेधार्थ लोकहित मंच, सांगली यांच्या वतीने लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांगली कार्यालयासमोर राजवाडा येथे तीव्र ‘थाळीनाद’ आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप मंचने केला आहे. या निष्काळजीपणाचा निषेध म्हणून रिकाम्या थाळ्या वाजवून प्रशासनाला जागे करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाद्वारे केवळ रस्त्याच्या दुरुस्तीची मागणीच केली जाणार नाही, तर कर्तव्यदक्षता न दाखवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांचाही जाहीर निषेध करण्यात येणार असल्याचे लोकहित मंचच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Leave a Reply