Advertisement

मिरजेमध्ये माजी मंत्री आणि आ. डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते जनगणनेला प्रारंभ

प्रतिनिधी सुधीर गोखले

एक मे रोजी देशातील १६ व्या जनगणनेला प्रारंभ झाला मिरजेतील तहसीलदार कार्यालय येथे माजी मंत्री आणि आम. डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते स्व गणना प्रक्रियेचा श्री गणेशा त्यांनी मोबाईल वरून केला. यावेळी आ. खाडे म्हणाले,’जनगणना ही केवळ आकडेवारी नसून, राज्याच्या आणि देशाच्या विकासाची भक्कम पायाभरणी आहे. अचूक माहितीच्या आधारे शासनाला नियोजनबद्ध निर्णय घेता येतात आणि विविध शासकीय योजना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवता येतात. यापूर्वी सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेचा उपयोग अनेक कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणी प्रभावीपणे झाला. त्याचप्रमाणे याही जनगणनेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. १ मे ते १५ मे या कालावधीत सर्व नागरिकांनी आपली नोंदणी करून या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा’. या अभियानाची सुरुवात करताना त्यांनी स्वतः आज पहिली नोंदणी करून सहभाग नोंदवला. जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडत, विकासाच्या या प्रक्रियेत आपण सर्व सहभागी होऊया.असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी मिरज तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासह वरिष्ठ उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!