Advertisement

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र वाचन सप्ताहाची सांगता

प्रतिनिधी सुधीर गोखले

‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असा संदेश देत खंबीर पणे आपल्या भक्तांना धीर देणारे अक्कलकोट वासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची आज पुण्यतिथी १५ एप्रिल १८७८ रोजी त्यांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार समजले जातात. आज त्यानिमित्त मिरजेतील पूर्व म्हाडा कॉलोनी मध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात गेल्या सात दिवस सुरु असलेल्या श्री गुरुचरित्र वाचन सप्ताहाचा सांगता सोहळा पार पडला या तब्बल ऐशी हुन अधिक भक्त मंडळींनी या श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्यात भाग घेतला. गेल्या २० वर्षांपासून या मंदिरामध्ये महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र परायणाची परंपरा अखंडपणे सुरु आहे या सोहळ्यामध्ये दर वर्षी भक्तांची वाढ होत आहे. श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराने या मंदिराची उभारणी केली आहे महापालिकेच्या खुल्या भूखंडावर उभे असलेले हे मिरज तालुक्यातील एकमेव मंदिर आहे या मंदिराला कळस नाही हे या मंदिराचे वैशिष्ट आहे. हे मंदिर म्हणजे साक्षात स्वामींचा अधिवास असल्याचा भक्तांना भास होतो. मंदिरामध्ये सुंदर आणि मन प्रसन्न करणारी अशी स्वामींची ब्राँझ धातूची मूर्ती स्थापिली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!