सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :- किरण माळी
धरणगाव तालुका एकलव्य सेनेची तालुका बैठक धरणगाव येथील व्हाइट हाउस येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष धरणगाव पी एम पाटील सर यांनी भिल्ल समाजातील बंधू भगिनींना मार्गदर्श न करताना सांगितले आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या तात्काळ सोडण्यात येतील व आपल्याला न्याय दिला जाईल. अनेक वर्षापासून भिल्ल समाजाच्या मागण्या असून त्यात प्रामुख्याने घरकुल उतारा नावावर होणे समाजकार्यालय, स्मशानभूमी,रेशन कार्ड अशा प्रलंबित मागण्या अनेक वर्षापासून धरणगाव तालुक्यात धूळ खात पडलेल्या आहेत याकडे अधिकारी ग्रामसेवक दुर्लक्ष करीत असून वास्तविक पाहता भिल्ल समाजासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनेक योजना असून या योजने पासून समाज बांधव वंचित आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब,तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी साहेबयांच्याशी चर्चा करून सर्व समाज बांधवांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन पी एम पाटील सर यांनी दिले लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व मागण्या तात्काळ मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले.
या प्रसंगी जळगाव जिल्हा एकलव्य संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब मोरे,अल्पसंख्यांक तालुका प्रमुख कालूवस्तात बापूसाहेब,राय शिंदे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले या प्रसंगी शिवसेना महिला तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील,एकलव्य सेनेचे तालुका प्रमुख भाऊसिंग सोनवणे,आनंदा गोंधळे,रमा सोनवणे,माजी सभापती भागवत मोरे,तालुका प्रमुख मंगला मोरे, भिल्ल समाजाच्या सर्व समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.