भडगांव : तहसीलदार बनसोडे यांनी घडवून आणलं. सलोखा योजनेअंतर्गत….
वर्षानुवर्षे पासून आपले क्षेत्र समजून उत्पन्न घेत असतांना कागदोपत्री नकाशात मात्र ते आपले नसून आपले शेत क्षेत्र हे दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात तर त्याचे क्षेत्र आपल्या ताब्यात अशा जमीन कसत असल्याचे दोघेही शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच दोघेही शेतकऱ्यांनी कोणताही वाद विवाद, नकारात्मक दृष्टीकोन न ठेवता जमिनीची अदलाबदल करून घेण्याचे ठरविले अन शेतकरी सलोखा योजनेअंतर्गत त्यांच्या जमिनी एकमेकांच्या नावे उताऱ्यावर पलटवून घेण्यात आल्याची विशेष बाबा भडगाव तालुक्यातील वरखेड शेतशिवारात गट नंबर 54 व 56 बाबत घडल्याची माहिती आज दिनांक 13 जुलै शनिवार रोजी सकाळी 8 वाजता शेतकऱ्यांनी दिली आहे. भडगगांव तालुक्यातील वरखेड शेत शिवारातील गट नंबर 54 प्रभाकर सखाराम पाटील व गट नंबर 56 भालचंद्र सखाराम पाटील यांचे क्षेत्र एकमेकांच्या ताब्यात असल्याने व त्यांना 12 वर्ष पुर्ण झालले, सलोखा योजनेअंतर्गत दोन्ही लाभार्थींना आपले क्षेत्र एकमेकांच्या ताब्यात देत रीतसर कागदोपत्री सर्व पूर्तता भडगांव तहसील कार्यालयात तहसिलदार विजय बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली करून घेत सहाय्य्क दुय्यम निबंधक पवार साहेब यांनी प्रक्रिया पूर्ण करून घेतली. याकामी मंडळ अधिकारी गिरड दिनेश येंडे व तलाठी वरखेड पी. के. पाटील यांनी सदर योजनेच्या कामी परिश्रम घेऊन महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. सदरचे प्रकरण दस्त गजेंद्र परदेशी स्टँप वेंडर यांनी तयार करून नोंदणी केली आहे. यामुळे दोन्ही शेतकऱ्यांतील अनेक प्रश्न कोणताही वाद न उद्भवता मार्गी लागले आहेत. भडगाव तालुक्यात असे वादग्रस्त प्रकरण समोर आल्याने भडगाव तहसीलदार या प्रकरणी जातीने लक्ष घालत शांततेत सर्व काही घडवून आणले यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने तहसीलदार विजय बनसोडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.