Advertisement

जळगाव :  विवाहितेवर तिच्या चुलत भावासह मित्रांकडून अत्याचार

जळगाव :  विवाहितेवर तिच्या चुलत भावासह मित्रांकडून अत्याचार

जळगाव : शहरात राहणारी विवाहिता नांदेड येथे लग्नात गेली असताना तीचा कपडे बदलवितांनाचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत, विवाहितेवर तिच्या चुलत भावासह त्याच्या दोघा मित्रांनी वेळोवेळी अनैसर्गिक रित्या अत्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ••शहरातील एका भागात २७ वर्षीय महिला ही कुटुंबासह वास्तव्याला आहे. ••दोंडाईचा येथे लग्नाच्या कार्यक्रमात कपडे बदलविताना तीचा व्हिडीओ काढला. ••तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत चुलत भावाने व त्याच्या मित्रांनी तीच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. चुलत भावानेच काढला व्हिडीओ•• महिला दोंडाईचा येथे काकाच्या मुलीच्या लग्नात गेली असताना तेथे कपडे बदलवित असताना महिलेचा चुलत भाऊ याने चोरून तिचा व्हिडीओ व फोटो काढला व संशयित आरोपी सचिन भाट (रा. नंदुरबार) याने यानंतर महिलेला फोटो दाखविले. महिलेने फोटो डिलीट कर, म्हणून सांगितले. मात्र, मी तुला जळगावला भेटायला येईल म्हणून संशयिताने सांगितले. त्यांनतर वेळोवेळी त्याने तिच्यासोबत पाच ते सहा वेळा व्हिडीओ व फोटो दाखवून जळगाव येथील घरात, पायघन हॉस्पिटलच्या मागील बिल्डिंग बांधकामाच्या ठिकाणी, दोंडाईचा शहरात जबरदस्तीने शारीरिक संबंध बनविले. सहन न झाल्याने अखेर महिलेची तक्रार•• फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार केला. याशिवाय पाळधी गावापुढच्या जंगलात महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन संशयित सचिन भाट याने व त्याचा मित्र निलेश तमाईचे (रा. नंदुरबार) अशा दोघांनी मिळून महिलेवर नैसर्गिक व अनैसर्गिक संभोग करून अत्याचार केला. तसेच . ६ जून रोजी दोंडाईचा शहरात नंदुरबार रोडवरील एका पत्र्याच्या खोलीत संशयित आरोपी सचिन भाट व त्याचा मित्र बंटी नेतले (रा. दोंडाईचा जि. धुळे) यानेही महिलेवर अत्याचार केला. अखेर कंटाळून सदर महिलेने घाबरून पती व कुटुंबियांना हि घटना सांगितली. सदर प्रकार हा. ४ डिसेंबर २०२२ ते ६ जून २०२४ च्या दरम्यान घडला आहे. दरम्यान हा प्रकार तिला सहन न झाल्याने थेट एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार २३ जून रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी सचिन भाट रा. नंदुरबार, बंटी नेतले रा. दोंडाईचा आणि निलेश तमाईचे रा. नंदुरबार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे.

 

सत्यार्थ न्यूज

अशाच पोस्ट साठी सत्यर्थ न्यूज ला सबसक्रायिब करा

बातमी आणी जाहिरात देण्यासाठी संपर्क चेतन सरोदे मो.9960922398

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!