सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :- किरण माळी
धरणगाव:- नवीन शैक्षणिक वर्षात ‘ एसटी पास थेट शाळेत ‘ या मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याकरिता एरंडोल आगार प्रमुख श्रीमती नीलिमा बागुल यांनी आज पी.आर.हायस्कूलला भेट देऊन प्रत्यक्ष पासेस व या मोहिमेचे पत्र दिले. यावेळी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ, एसटी महामंडळाचे प्रतिनिधी श्री. आर. बी. सोनवणे, श्री. विलास पाटील,शाळेचे पासेस विभाग प्रमुख दिनेश सूर्यवंशी, शिक्षक निरज शिंदे हे उपस्थित होते. शाळेच्या वतीने उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ यांनी निलिमा बागुल यांचा बुके देऊन सत्कार व स्वागत केले .या मोहिमेत आता विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा गरज नसून शाळेतच पास देण्याची मोहीम एसटी महामंडळाने सुरू केली आहे.
विद्यार्थ्यांना एसटी मासिक पासवर ६६% सवलत दिली जाऊन फक्त 33% रक्कम भरून पास मिळेल तर बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत एसटी पास दिली जाणार आहे. या पासेस आता शाळेतच वितरित केले जाणार आहेत.