पाचोरा : रेल्वेतून पडताच अंत…
आज दिनांक 17 मे शुक्रवार रोजी सकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास पाचोरा ते गाळण रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने अज्ञात इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाचोरा ते गाळण रेल्वे स्टेशन दरम्यान खंबा किलोमीटर क्रमांक 396/16/18 तारखेडा जवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून अज्ञात इसम पडल्याने त्याचा आज दिनांक 17 मे रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला आहे, घटनेची माहिती लोको पायलट याने देताच पाचोरा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली, घटनेचा पंचनामा करत जय मल्हार रुग्णवाहिका संचालक बबलू मराठे व चालक अमोल पाटील यांचे मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आलेला असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.