गणेश धनगर. दिनांक 31/01/2025.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संचलित कृषी विज्ञान केंद्राला जळगाव लोकसभा खासदार स्मिता ताई पाटील यांनी भेट देऊन,
येथे चालविण्यात येणाऱ्या कृषी उपक्रम संशोधन कार्य आणि शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकर्यानपर्यत पोहोचवून त्यांना अधिक उपयुक्त ठरवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या. यावेळी कृषी विज्ञान केंद्राला लागवड केलेल्या पिकांची देखील पाहणी केली.