लातूर -भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेशची विभागीय बैठक संपन्न
लातूर – दि.२० जानेवारी रोजी रुक्मिणी मंगल कार्यालय येथे भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश ची विभागीय बैठक संपन्न झाली, सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाई चंद्रशेखर नलावडे पाटील, भारतीय किसान युनियन आणि प्रमुख उपस्थिती प्रदेश महासचिव मावळा रुपाली ताई पाटील भारतीय किसान युनियन उपस्थित होते.
किसान नेता राकेशजी टिकैत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेची सुरुवात मराठवाड्यातून सुरुवात करण्यात आली
श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना वंदन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात संघटनेचे ध्येय,उद्दिष्ठ ह्यावर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. सदरील कार्यक्रमात मराठवाडा प्रभारी भाई नेहरू देशमुख ह्यांची मराठवाडा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तसेच लातूर जिल्हा अध्यक्ष भाई आर डी काळे आणि धाराशिव जिल्हा अध्यक्ष भाई दत्ता आवाड ह्यांनी नियुक्ती प्रदेश प्रभारी आणि प्रदेश महासचिव ह्यांच्या उपस्थितीत भाई नेहरू देशमुख ह्यांच्या हस्ते करण्यात आली.
येणाऱ्या काळात मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात लढा उभारत शेतकऱ्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देन्यासाठी भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश आग्रही राहील अशी ग्वाही दिली .
सदरील कार्यक्रमास भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी सदस्य, मराठवाडा विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.
मराठवाड्यात भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेशचा प्रवेश नक्कीच शेतकरी बांधवांना एकसंघ करून अन्याय,हमीभाव,मूलभूत सुविधा ह्याबद्दल आंदोलनाच्या मदतीने हक्क मिळून देईल .
उपस्थित सदस्यांमध्ये प्रशांत इंगळे राज्य कार्यकारिणी सदस्य,भाई गजानन भोसले राज्य कार्यकारिणी सदस्य, जगदीश जाधव पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य ( प्रदेश प्रभारी सोशल मीडिया, राज्य कार्यकारिणी सदस्य, निकिता जाधव पाटील सदस्य भारतीय किसान युनियन, इत्यादी सदस्य मराठवाडा विभागातील पदाधिकारी उपस्थित होते