गणेश धनगर. दिनांक 18/01/2025.
जळगाव शहरातील सेंट टेरेसा विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने 52 व्या जिल्हास्तरीय

विज्ञान प्रदर्शनाचे मंञी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी श्री सरस्वती पूजन दीपप्रज्वलन करून व डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले की मोबाईलचा वापर केवळ गरजेसाठी करावा. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलला मिञ यांच्याऐवजी आपले खरे मित्र म्हणजे शिक्षक आणि पालक असल्याने पटवून दिले. यावेळी मंञी गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे,जळगावचे शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, सचिन परदेशी,इ.आर.शेख,रागीनी चव्हाण, ज्ञानेश्वर सोनवणे, किशोर राजे, जिल्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती.
Leave a Reply