नांदूर मधमेश्वर कालव्यात सापडला महिलेचा मृतदेह.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर गंगापूर मधील नांदूर मधमेश्वर कालव्यास सध्या रब्बी पिकांसाठी पाणी चालू आहे वक्ती शिवारात चारी क्रमांक 24 वर गट नंबर 82 या ठिकाणी शेतकरी साईनाथ अंबादास पठारे यांनी कालव्यात काहीतरी दिसतोय म्हणून जवळ जाऊन बघितले तर एका महिलेचा मृतदेह पाण्याच्या पाईपला अटकलेला होता त्यांनी ताबडतोब आरडा ओरडा करत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून त्या महिलेला बाहेर काढले नंतर विरगाव पोलीस स्टेशनला कळविले .
विरगाव पोलीस त्या ठिकाणी आले व त्या महिलेची ओळख पटली मयत महिला छायाबाई अशोक लखपती राहणार पानवी बुद्रुक. विरगाव पोलिसांनी पंचनामा करून अधिक तपास विरगाव पोलीस स्टेशन करत आहे