गोंडवाना विद्यापीठात जनसंवाद विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी सुरुवात.
गडचिरोली
येथील गोंडवाना विद्यापीठातील जनसंवाद विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने 6.23 कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विद्यापीठात जनसंवाद क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक इमारत तयार होणार आहे.
✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️📲9423170716
या इमारतीत वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वाचनालय आणि इतर आवश्यक सुविधा असतील या प्रकल्पामुळे गोंडवाना विद्यापीठात जनसंवाद शिक्षणाला चालना मिळालं आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, याशिवाय या क्षेत्रातील संशोधन आणि विकासालाही प्रोत्साहन दिले जाईल.
उपकरणे खरेदी करण्यासाठी मान्यता
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील जनसंवाद विभागासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 3.38 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
राज्याच्या उच्च शिक्षण जारी केलेल्या शासन निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाच्या वतीने जनसंवाद विभाग आधुनिक उपकरणे सुसज्ज करण्यात येणार आहे. या उपकरणांमध्ये कॉमेरा, मायक्रोफोन, संगणक, साफटवेयर आणि इतर आवश्यक उपकरणे समाविष्ट आहेत.
या प्रकल्पामुळे विद्यापीठातील जनसंवाद शिक्षण अधिक व्यावहारिक बनवले जाणारं आहे. उद्योगात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली जाईल. तसेच, जनसंवाद क्षेत्रात विद्यापीठाला अग्रगण्य संस्था बनविण्यासाठी मदत होईल.
हा निर्णय गोंडवाना विद्यापीठ आणि परीसरातील जनतेसाठी महत्वाची उपलब्धी आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू डॉ श्रीराम कांवळे , कुलसचिव डॉ अनिल हिरे खान यांच्या सहकार्याने स्वागत केले असून. विद्यापीठाच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साठी हि आनंदाची बातमी आहे.