सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांना राज्यस्तरीय पञकार भुषण पुरस्कार जाहीर
पुणे येथे दि.८ डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थीतीत होणार सन्मान
सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक चळवळीच्या मानबिंदु असलेला SJSF राज्यस्तरीय पुरस्कार राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा 202४ रोजी संपन्न होत आहे.दि.८ डिसेंबर पुणे येथे होत असलेल्या या सोहळ्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील नामांकीत पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना राज्यस्तरीय आदर्श पञकार भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सौ. निलमाताई संदिप पाटील नारिशक्ती सामाजीक महिलासंस्था महाराष्ट्रराज्य अध्यक्षा मुंबई, मा. बाळराजे वाळुजकर मराठी सिने अभिनेता, मा. अन्वी अनिता चेतन घाटगे हिरकणी शिखर कन्या जागतिक विक्रमवीर जगातील सर्वात लहान क्लेमबर मा. आम्रपाली ण्यानोबा पारखे साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन अध्यक्षा व विद्रोही प्रबोधनकार आधिपरिचारिका ह्यांच्या उपस्थितीत होणार आहे.या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मा. ऋतुजा पाटील मा. काव्या मुंबईकर मराठी सिने अभिनेत्री महाराष्ट्राची लावण्यवती असणार आहे.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अनिता चेतन घाटगे गिर्यारोहक प्रशिक्षक राष्ट्रीय वक्त्या जिल्हाध्यक्षा सत्यशोधक विचारमंच हे असणार तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक मा. प्रा. धाराशिव वैजनाथ शिराळे साहायक प्राध्यापक मराठी विभाग शिवाजी महाविद्यालय, हिंगोली यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कार्यक्रमास विशेष मान्यवर म्हणून मा. डॉ. शबनम शबिर शेख भारतीय आंतराष्ट्रीय महिला कुस्ती प्रशिक्षक व अंतराष्ट्रीय खेळाडु भारत केसरी
मा. जानवीराजे पाटील मॅडलीग अॅन्ड अभिनेत्री, मा. भक्ती साधु, मा. चित्रा दिक्षित सिनेस्टार अभिनेत्री उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम दिनांक ०८ डिसेंबर २०२४ वार रविवार वेळ : दुपारी १२ ते ०४ पर्यंत असणार. मा. सुजताताई गुरव सासवड पुणे अध्यक्षा महाराष्ट्र महिला ब्रिग्रेड ,मा.प्रा.डॉ. राजु नामदेव पांचाळ मा. उत्तम चांदराव शेळके मा. अॅड. निता संजय शेळके ,राजर्षी शाहू अभियांत्रीकी महाविद्यालय तथावडे, पुणे महाराष्ट्र महावितर वरिष्ठ अभियंता ,उच्च न्यायालय नागपुर ( भारत सरकार नोटरी ) मा. शैलेष भट्ट (पोलीस मित्र व सामाजीक कार्यकर्ते) असणार आहेत.या सोहळ्यात पुरस्कार शुभहस्ते मा. डॉ. विद्या श्री शिवाजी यमचे अभिनेत्री
मा. नितीन सुर्यवंशी डायरेक्टर इशान्य गृपऑफ कंपनी, पुणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.कार्यक्रमाचे सुत्र संचालक मा. अॅड. उमाकांत आदमाने ( नोटरी भारत सरकार )
कवी साहित्य निवेदक मा. महेश्वरी मंगेश गिरडे ऊत्कृष्ट वक्त्या व निवेदिका राहणार.हा सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह ९१७ गंजपेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.बहुसंख्येने या कार्यक्रमाला ऊपस्थीत राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक कमेटीचे सचिन हळदे, राहुल भाऊ निकाळजे, सत्यदिप खडसे भारत हळदे, दिनेश गायकवाड, पवन शेळके यांनी केले आहे.