सत्यार्थ न्युज प्रतिनिधी – किरण माळी
पाळधी (प्रतिनिधी) येथील तालुका विधी समिती व तालुका वकील संघाच्यावतीने न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण कोर्टाचे 326 प्रकारणांपैकी 43 प्रकरणे निकाली काढण्यात आले.
तसेच बँका, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, नगरपालिका, बी. एस. एन. एल. यांचे कडील एकूण 994 प्रकारणांपैकी 45 प्रकरणे निकाली काढण्यात आले. अदालतीत एकूण 33,20,642 रूपयांची वसूली करण्यात आली.
पॅनल प्रमुख म्हणून धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश श्री अविनाश ढोके, तसेच पंच म्हणून ॲड. अक्षय दवे यांनी काम पाहिले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर.एस.शिंदे, उपाध्यक्ष ॲड. व्ही.एस.भोलाणे, सचिव ॲड. मनोज दवे, ॲड.राहुल पारेख, ॲड.शरद माळी, ॲड.डि.ए.माळी, ॲड. संदीप सुतारे, ॲड. प्रशांत क्षत्रिय, ॲड.एकनाथ पाटील,ॲड.प्रदीप पाटील, ॲड.रावसाहेब पाटील,आदी उपस्थित होते. सदर लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी धरणगाव न्यायालयातील सहा.अधीक्षक. डी. एम. कुलकर्णी, एस. पी. चौधरी वरिष्ठ लिपिक, तसेच व्ही. पी. सपकाळे, संतोष भालेराव, गुलाब लांबोळे, श्याम पाटील, ईश्वर चौधरी, राहुल पाटील, कनिष्ठ लिपिक तसेच राहुल बोरसे शिपाई यांनी परिश्रम घेतले.