मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी ७०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारण्यासह नवीन इमारतीसाठी निधीची मागणी; माजी मंत्री तथा आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे
प्रतिनिधी सुधीर गोखले
पावसाळी अधिवेशनादरम्यान माजी मंत्री तथा मिरजेचे विद्यमान आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी अनेक लोकाभिमुख मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्र्यांकडे केल्याची माहिती आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली त्यामध्ये मिरजेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय परिसरात नव्याने ७०० खाटांचे सुसज्ज असे नवीन रुग्णालय उभारण्यासाठी निधी मंजुरीचा प्रस्ताव दिला आहे. ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे हा प्रस्ताव त्यांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या या प्रस्तावाला ना हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच पात्र शेतकऱ्यांची रु २ लाखांपर्यंत पीक कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ₹५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केले असून कृषी पंपांच्या जुन्या थकीत वीज बिलाची ₹४८ हजार कोटींची माफी तसेच टप्प्याटप्प्याने दिवसा मोफत वीज देण्याचा संकल्प ही पूर्ण केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सासवड–जेजुरी महामार्गावरील वारकरी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच आषाढी वारीनिमित्त ‘चरण सेवा’ उपक्रमांतर्गत आरोग्यसेवकांसाठी नाश्ता, चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून दि. 18 व 21 जुलै 2026 रोजी भोसे येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केले.
Leave a Reply