Advertisement

मिरजेतील प्रभाग चार च्या नगरसेविका सौ. अपर्णा विवेक शेटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

मिरजेतील नागरिकांना शासकीय सेवा आणि नागरी सुविधा अधिक जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने GMO कार्यालया अंतर्गत तांदूळ मार्केट येथे ‘पालकमंत्री सेवा सुविधा केंद्राचे लोकार्पण आज पालकमंत्री ना चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाली. तांदूळ मार्केट येथील प्रभाग चार च्या नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेटे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये हे केंद्र सुरु झाले असून नागरिकांनी येथे उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री ना चंद्रकांतदादा यांनी केले. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी एकाच ठिकाणी मार्गदर्शन व आवश्यक सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे त्यांच्या वेळेची आणि श्रमांची मोठी बचत होईल, असा मला विश्वास आहे असे मत पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. याच प्रसंगी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ च्या नगरसेविका अपर्णा शेटे यांच्या संपर्क कार्यालयाचेही उद्घाटन मंत्री महोदयांनी केले. जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी हे कार्यालय निश्चितच प्रभावी माध्यम ठरेल यात शंका नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी गटनेते संदीप आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, मोहन वाटवे, भाजपा नेते सुरेशबापू आवटी, पांडुरंग कोरे, उद्योजक विवेक उर्फ बंडू शेटे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!