
सध्या राज्यामध्ये मुंडे इफेक्ट ची चर्चा जोरात सुरु आहे. कोणतेही हॉटेल किंवा रेस्टोरंट असो तिथे गेल्या कित्तेक वर्षांपासून नियम धाब्यावर बसवून कारभार चालत होता. मात्र गेल्या तीन महिन्यांमध्ये मुंडेंनी राज्यभरात सुरु केलेल्या कारवाईमुळे भेसळसम्राट चांगलेच धास्तावले आहेत काही दूध डेअरी किंवा संकलन केंद्रांमध्ये मुंडे यांचा प्रभाव जास्त दिसून येत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या जिल्ह्यातील दमदार कारवाईमुळे अन्न परवान्यांच्या मागणीमध्ये चक्क पाचपट वादंग झाली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी जिल्ह्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे सहा आयुक्त रावसाहेब समुद्रे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार आम्ही जिल्ह्यातील होटेल्स आणि रेस्टोरंट तपासणी मोहीम हाती घेतली होती यामध्ये स्वच्छता आणि स्वच्छ पाणीपुरवठा याला प्राधान्य देण्याबाबत आम्ही आग्रही आहोत जिथे त्रुटी आढळून आल्या त्या हॉटेल्स आणि रेस्टोरंट ना आम्ही नोटिसा जरी केल्या आहेत त्यानुसार ठराविक कालावधी मध्ये त्यांनी स्वच्छता आणि इतर बाबीची पूर्तता करण्याची आहे. अन्न सुरक्षा कायद्याबाबत सतत आम्ही जनजागृती आपल्या माध्यमातून करत आहोत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत असल्यामुळे व्यावसायिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे सध्या अन्न व्यवसायाचे परवाने मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो कि महापालिका क्षेत्रामध्ये कोठेही हॉटेल्स किंवा रेस्टोरंट मध्ये अस्वच्छता किंवा पाण्याच्या बाबत शंका असल्यास आमच्या विभागाला त्याची माहिती कळवावी तातडीने आम्ही त्या त्या हॉटेल्स, रेस्टोरंट वर कारवाई नक्की करू. आज महापालिका क्षेत्राबरोबर जिल्ह्यामध्ये आमच्या विभागाने निश्चितपणे भेसळखोरी रोखण्यात यश मिळवले आहे. साधारण १ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधी मध्ये जिल्ह्यामधील ५ हजार २१३ अन्न व्यवसाय परवाना नोंदणी करण्यात आली तर १२७ परवाने देण्यात आले. कमी कालावधी मध्ये इतके अर्ज येण्याची हि कदाचित पहिलीच वेळ असावी. मात्र अजूनही जे व्यावसायिक नियम बाह्य व्यवसाय करत आहेत ते आमच्या रडारवर आहेत कारवाई नक्की होणार. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले
Leave a Reply