आज संपूर्ण महाराष्ट्रासह भारतवर्षाला समतेची न्यायाची शिकवण देणारे आणिकोल्हापूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने एका ठराविक उंचीवर नेऊन ठेवणारे दूरदृष्टी असणारे लोकराजा जनतेच्या मनातील राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची १५२ वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित १५२ पुस्तकाचे वितरण शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रा मोहन वनखंडे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आले यावेळी शिवसेना नेते अशोक शिंदे, काँग्रेस चे नेतेप्रा.प्रमोद इनामदार सर, अशोकसिंह राजपुत, बाळासाहेब लिपाणे पाटील, रघूवीर चव्हाण, दादासो पाटील, विजय धुमाळ सर, किरण भुजुगडे, प्रकाश पवारमदन तांबडे ओंकार भोसले, अशोक पाटील कोकळीकर, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना नेते विलास देसाई म्हणाले कि आपले सर्वांचे दैवत छत्रपतीशिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवतं समतेची शिकवण संपूर्ण महाराष्ट्राला दिली आज त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्था किंवा स्थापत्य शास्त्राचे कोल्हापुरातील एकापेक्षा एक वास्तू बघण्यासारख्या आहेत आणि अभ्यासण्यासारख्या आहेत त्यांच्या दूर दृष्टीतून उभे राहिलेले राधानगरी धरण आजही कित्तेक लाख कोल्हापूरकर नागरिकांची तहान भागवत आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रा मोहन वनखंडे म्हणाले आज छत्रपतीराजश्री शाहू महाराजांची शिकवण आणि त्यांचे विचार प्रत्येकाने अंगिकाले तर आपला महाराष्ट्र आणि भारत देश जगामध्ये नक्की पहिल्या रांगेत बसेल.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply