आयुष्यभर रंगभूमीची मनोभावे सेवा करून रसिक मायबाप प्रेक्षकांना सुखावले असेल तर त्याने पुन्हा वयाच्या ६० नंतर रंगभूमीवर किंवा या समितीसमोर आपली सेवा सादर करायची का? याबाबत कलाकार निवड समिती ने आक्रमकपणा दाखवत या गोष्टीला ठाम विरोध दर्शवला आहे तर पालकमंत्र्यांना याबाबत निवेदन देण्याचे ठरवले आहे. सन २५-२६ सालच्या दाखल अर्जावर निर्णय घेऊन कलाकार निवड करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या समितीमध्ये नऊ अशासकीय सदस्य तर पाच शासकीय सदस्यांचा समावेश आहे. या समितीमधील अशासकीय सदस्यांनी निवड केलेली नावे अंतिम करावीत असा शासन नियम आहे. मात्र प्रशासनाने निवड झालेल्या कलाकारांसमोर सादरीकरण करण्याची अट ठेवली आहे. आता प्रशासनापुढे हे वृद्ध कलाकार हाती तुणतुणं किंवा वाद्ये घेऊन आपली कला सादर करत होय महाराजा मी कलाकार आहे असे म्हणायची वेळ त्यांच्या नशिबी आली आहे. वयाच्या ५० शी नंतर शासनाची हि ५००० रु मानधन असलेली योजना आहे. यामध्ये सन २५-२६ मध्ये ६४० अर्ज दाखल झाले या अर्ज मंजुरीची मर्यादा सुद्धा वर्षाकाठी फक्त १०० आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत हि योजना चालवी जाते. याबाबत मिरजेतील जेष्ठ कलाकार आणि पत्रकार धनंजय फाटक आणि छत्रपती राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचे विद्यमान सदस्य आणि जेष्ठ कलाकार निवेदक विजय केडणे म्हणाले,’आता वयाच्या ५० शी नंतर गरजू कलाकाराला जर मानधन मिळायचे असेल तर आपले पथक स्वखर्चाने तयारीनिशी समितीपुढे सादरीकरण करण्यासाठी आणावे लागेल हे शक्य होईल का ? तसेच एखाद्या गायक कलाकाराचा आवाज त्याच्या वयाच्या ६० व्या वर्षी अगदी चिरतरुण असेल का ? हि साधी गोष्ट प्रशासनाला समजलेली नाही आम्ही याबाबत पालकमंत्री मोहोदयांना निवेदन दिले आहे. लवकरच जिल्हा प्रशासनाची बैठक बोलावून याबाबत तोडगा निघेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो’.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply