Advertisement

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मिरजेतील कु जान्हवी संजय रुपलग हिचे दहावी परीक्षेत संपादन केलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल केले कौतुक

प्रतिनिधी सुधीर गोखले

इयत्ता दहावी परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या नाट्यसिने अभिनेते लेखक रिलस्टार संजय रुपलंग यांची कन्या कु जान्हवी हिचे विशेष कौतुक राज्याचे उद्योगमंत्री ना उदय सामंत यांनी मिरजेतील एका कार्यक्रम प्रसंगी केले. शिवसेना नेते प्रा मोहन यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री सामंत हे मिरज दौऱ्यावर होते त्यादरम्यान शिवसेना सांगली जिल्हा उपाध्यक्ष माधवराव गाडगीळ यांच्या निवासस्थानी मंत्री मोहोदयांनी हजेरी लावली यावेळी शिवसेना वैद्यकीय कक्ष सांगली जिल्हाध्यक्ष श्रेयस गाडगीळ यांनी मंत्री महोदयांना कु. जान्हवी रुपलग हिने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केल्याची माहिती दिली. लागलीच मंत्र्यांनी कु जान्हवी आणि तिच्या कुटुंबियांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली कु. जान्हवी रुपलग हिचा विशेष सत्कार करून तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी किरणसिंह राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!