Advertisement

जिल्ह्यामधील हातभट्ट्या उध्वस्त; ‘राज्य उत्पादन’ ची दमदार कारवाई ; यापुढे कोणत्याही प्रकारे अवैध देशी अथवा विदेशी मद्य विक्री किंवा हातभट्या जिल्ह्यात चालणार नाहीत; अधीक्षक प्रदीप पोटे यांचा इशारा

प्रतिनिधी सुधीर गोखले

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वी विषारी गावठी दारू पिल्याने तब्बल 24 लोक मृत्युंमुखी पडले आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न, औषध प्रशासन यांनी राज्यभर कारवाईचा बडगा उचलला. सांगली जिल्ह्यातही सांगली पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क तसेच अन्न आणि औषध प्रशासन यांनी अनेक ठिकाणी कारवाईचा बडगा उचलला काही गावांमधून तसेच अगदी शहरी भागा लगत सुरु असलेल्या हातभट्ट्या उध्वस्थ केल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार स्वतः जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे यांच्यासह उपनिरीक्षक अजय लोंढे आणि जयसिंग खुटावळे यांनी त्यांच्या पथकासह या मोहिमेमध्ये भाग घेतला यावेळी झालेल्या कारवाई मध्ये देशी मद्य (सुमारे ५७.३२ बल्क लिटर), हातभट्टी निर्मित मद्य (सुमारे १०१५ बल्क लिटर),विदेशी मद्य (IMFL Beer in state ३.७२ बल्क लिटर), ताडी (सुमारे २५० बल्क लिटर) या छापासत्रामध्ये जागीच रसायने नाश करण्यात आली जी सुमारे १०१२० बल्क लिटर इतकी आढळून आली, या संपूर्ण कारवाई मध्ये एकूण ४१ विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून २९ आरोपीना अटक करण्यात आले आहे या कारवाई मध्ये सुमारे ५ लाख ७१ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे अशा प्रकारे हातभट्ट्या चालवणाऱ्यांचे आणि अवैध पद्धतीने मद्य विक्री करणाऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. तर यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असा एकप्रकारे समज अधीक्षक प्रदीप पोटे आणि उपाधीक्षक दीपक सुपे यांनी दिला आहे. अधीक्षक प्रदीप पोटे म्हणाले की, ‘महापालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागात अशा पद्धतीने कोठेही हातभट्ट्या किंवा अवैध पद्धतीने देशी अथवा विदेशी (गोवा मेड) मद्याची निर्मिती किंवा विक्री अथवा वाहतूक नागरिकांना आढळून आली तर तातडीने आमच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. त्याचप्रमाणे अवैध पद्धतीने बार आणि परमिट रूम मधून देशी अथवा विदेशी (गोवा मेड) मद्याची विक्री बार चालकानी करू नये आमच्या विभागाचे अशा बार चालकांवर बारीक लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!