आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने
जागतिक महिला दिनानिमित्त महिला गुणगौरव पुरस्कार संपन्न.
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

आजची महिला सशक्त व सक्षम भारतीय नारी बनेल
सोलापूर समाज कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 8 मार्च 2026 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक,क्रीडा व सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गुणगौरव पुरस्कार शिवानुभव मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला.
या पुरस्कारास प्रमुख पाहुण्या म्हणून रजिंता चाकोते,( स्थायी समिती सभापती म.न.पा सोलापूर) , शोभाताई बनशेट्टी ( माजी महापौर) , भाग्यश्री जाधव( राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक) नंदा लाहोटी अध्यक्ष ( लायन्स क्लब ऑफ सोलापूर) संरोजना मुलींटी ( मुख्याध्यापिका गांधी नाथा रंगजी प्राथमिक शाळा) आनंद तालिकोटी अध्यक्ष आस्था सामाजिक संस्था) (शिवानंद सावळगी सचिव आस्था सामाजिक संस्था) सुहास छंचुरे प्रसिद्धी प्रमुख), अनिल जंमगे,योगेश कुंदुर यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक सामाजिक क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना महिला गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र,शाल फेटा, ट्रॉफी भेटवस्तू असे होते.
याप्रसंगी आपल्या भाषणामध्ये रजिता चाकोते मॅडम यांनी म्हणाले की महिलांनी सक्षम व सशक्त व्हावे त्या आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत तसेच महिलांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी व आपले आरोग्य निरोगी ठेवावे ती निरोगी असेल तर समाज, देश एक सशक्त नारी बनेल ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेते त्याचप्रमाणे ती समाजामध्ये आपली खारीचा वाटात देखील योगदान देते ती स्वतःचे संरक्षण केले पाहिजे तसेच संरक्षणाचे धडे घेऊन सकारात्मक विचाराने मुली व महिला आपली जीवनाची वाटचाल घेतली पाहिजे तरच आजची महिला सशक्त व सक्षम नारी बनेल आस्था सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे आस्था सामाजिक संस्था अन्नदानाबरोबर येथील देखील ते उपक्रम राबवत असतात ते वाकडण्याजोगे आहे असे म्हणाले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसुंधरा पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा कंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुहास छंचुरे यांनी मानले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदांत तालिकोटी, पिंटू कस्तुरे, सुरज छंचुरे,उदय छंचुरे, , य, प्रथमेश गावडे, अथर्व शिंदे यांनी परिश्रम घेतले.
तसेच विशेष आभार या कार्यक्रमासाठी शिवानुभव मंगल कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील घेण्यात आले तसेच त्यांना भेटवस्तू देण्यात आले तसेच गरिब,गरजू 100 महिलांना भेटवस्तू देखील वाटप करण्यात आले
* पुरस्कार प्राप्त महिला
* ,अनिता मोरे ( महिला पोलिस अंमलदार)
* वंदना तळीखेडे ( महाराष्ट्र कामगार कल्याण सहाय्यक)
* सुजाता जुगदार ( मुख्याध्यापिका छत्रपती शिवाजी प्रशाला)
* स्नेहल पेंडसे ( योग प्रशिक्षिका)
* उषा क्षिरसागर ( पोस्ट मास्टर)
* महादेवी धुळे ( समाजसेविका)
* प्रिया माने ( आरोग्य सेविका म.न.पा)
* डॉ अश्विनी करपे ( डेंटिस्ट)
* डॉ.शितल कुलकर्णी (आयुर्वेदाचार्य)
* अश्विनी देवद्वारे (सहशिक्षिका चतुराबाई श्राविका प्राथमिक शाळा)
* अर्चना अक्कलकोटे (सहशिक्षिका पी.एस. इंग्लिश मीडियम स्कूल)
* प्रतिमा स्वामी ( सहशिक्षिका वि.मो.मेहता विद्यालय)
* ऐश्वर्या खडके (उद्योजिका)
* ज्ञानेश्वरी भोसले ( NIE सकाळ वृत्तपत्र समन्वयक)
* तेजस्वी रायलिवाला (प्रशिक्षिका मोटर ड्रायव्हिंग स्कूल)
* अंजली साबळे (एलआयसी एजंट)
















Leave a Reply