Advertisement

उमाबाई श्राविका विद्यालयाच्या वतीने T 20 वर्ल्ड कप होणाऱ्या भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा दिले

उमाबाई श्राविका विद्यालयाच्या वतीने T 20 वर्ल्ड कप होणाऱ्या भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा दिले


8 मार्च रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या T20 वर्ल्ड कप भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश झाला आहे भारत विरुद्ध न्युझीलँड यांच्यात अंतिम सामना होणार आहे या प्रसंगी उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने एकूण 800 विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.
उमाबाई श्राविका विद्यालयातील विद्यार्थी आनंदोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे

या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी हातामध्ये भारताचा तिरंगा ध्वज घेऊन इंडिया, इंडिया म्हणत शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, वरिष्ठ दिप्ती शहा, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, माधवी खोत, प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे,अनुप कस्तुरे प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
यंदाचा T20 वर्ल्ड कप भारत जिकेलच भारतीय संघ विश्व विजेता होणारच असा विश्वास सर्व बाल खेळाडूंनी केला आहे.
या प्रसंगी कु.रामेश्वरी बंडखोर यांनी आपल्या भाषणात भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!