पाचोरा : 37 वर्षीय ईसम अन 12 वर्षीय अल्पवयीन, तिक्यात मुलीची आई….
पाचोरा : तालुक्यातील एका गावातून गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास गरीब कुटुंबातील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळून नेल्याचा प्रयत्न आईच्या सतर्कतेने फसला असून मुलीस पळवून नेणारा संशयित इसम घटनास्थळावरून पसार झाला असून आज दिनांक 5 जुलै शुक्रवार रोजी संशयित परप्रांतीय 37 वर्षीय इसम विनोद कुमार पटेल याच्या विरोधात अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.