चाळीसगाव ब्रेकिंग ! भयानक बेट्री स्फोट!
😱 दुचाकिस्वार…..
चाळीसगाव तालुक्यातील खेडी खुर्द (खेडी -खेडगाव) येथील शेत शिवारात बजाज प्लॅटिना या दुचाकीमधील बॅटरीचा स्पोट झाल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, खेडी खुर्द तालुका चाळीसगाव येथील शेतकरी किरण बापू पाटील हे शेतात कपाशी लागवड करण्यासाठी ठिबकच्या नळी पसरविण्याचे काम करून झाल्यानंतर घरी परतिच्यावेळी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास मोटर सायकलला सुरु करण्यासाठी किक मारताच दुचाकी ( M H 19 D C 7154 ) सुरु होताच सेकंदात खूपच मोठ्या प्रमाणात बॅटरीचा स्पोट झाला अन किरण पाटील हे त्यात रक्तबंबाळ झाले, घटनेची माहिती गावात येताच क्षणातच गावातून शेकडो लोकांनी घटनेस्थळी धाव घेत तात्काळ त्यांना चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले, त्यात शेतकरी किरण पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना शरीराच्या मागील भागात जबरदस्त दुखापत झाली असून आज दिनांक 2 जून रविवार रोजी त्यांचे वर उपचार सुरू असून सद्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांचा आई, वडील, एक भाऊ, पत्नी दोन मुले असा परिवार असून या घटनेने दुचाकी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र एकाएकी गाडीतील बॅटरीचा असा स्फोट होऊन इतकी मोठी घटना घडण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.