पाचोरा ब्रेकिंग : काळाचा घात…..

पाचोरा तालुक्यातील माहिजी ते म्हसावद रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे किलोमीटर खंबा क्रमांक 389/17/19 नजीक आज दिनांक 1 जून शनिवार रोजी कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने पिंपळगाव मुळगांव असलेले राजेंद्र पाटील हल्ली मुक्काम जळगांव येथील रहिवासी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 6 वाजता उघडकीस आली आहे. ते जळगांव येथील खाजगी पेट्रोल पंपावर कामकाज करीत होते. राजेंद्र पाटील हे दिनांक 31 मे रोजी पाचोरा येथे त्यांचे नातेवाईकात असलेल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आले असता पाचोरा येथून जळगाव येथे रात्रीच्या वेळी परतीचा प्रवास करीत असताना काळाने झडप घातली अन धावत्या रेल्वेतून पडून त्यांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, घटनेची माहिती आज दिनांक 1 जून रोजी सकाळी 6 वाजता प्राप्त होताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल भगवान बडगुजर हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेहास पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला होता. मयताचे पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगी, अविवाहित मुलगा असा परिवार आहे, मुलगा स्वप्निल पाटील हा दुबई येथे कामकाजा निमित्त गेला असल्याने घटनेची माहिती मिळताच दुबईहून जळगांव परतीचा प्रवास करीत असून पहाटे जळगांव पोहचणार असल्याने दिनांक 2 जून रोजी मयतावर जळगांव येथील राहते घरी अंत्यविधी पार पडणार आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

















Leave a Reply