भडगाव तालुक्यातील नालबंदी गावाजवळील पुलावर घडलेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी….
भडगाव तालुक्यातील नालबंदी गावाजवळील पुलावर घडलेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 27 मे सोमवार रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. भडगाव तालुक्यातील नालबंदी गावाजवळील छोट्या पुलावर तालुक्यातील सावदे येथील लग्नाला गेलेल्या दोन शेतमजूरांच्या नव्या पल्सर या दुचाकीचा अपघात घडला, यातील दुचाकी वरील दोघेही पुलाचे कठडे वरून खाली पडले, यात सावदे गावातील संतोष भिल या शेतमजूराचा जागीच मृत्यू झाला तर सावदे गावातीलच असलेला दुसरा शेतमजूर गोकुळ भिल हा गंभीर जखमी झाला असून त्याचेवर भडगांव रुग्णालयात उपचार सुरु असून जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे. यातील मयत संतोष भिल याचे पश्चात चार भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून तो शेतमजूरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचेवर दिनांक 28 मंगळवार रोजी सावदे गावात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.