पाचोरा तालुका ब्रेकिंग : नुकतच घडलं, कार उलथली.
लासगाव जवळील टर्नवर चारचाकी वाहन उलटल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 17 मे शुक्रवार रोजी सकाळी 11.30 वाजता घडली आहे. पाचोरा तालुक्यातील लासगाव जवळील जळगांव हायवेवरील टर्न वर वाहन टर्न करतेवेळी चारचाकी वाहनात तांत्रिक अडचण आल्याने ते कठडयांना आदळून जोरदार उलटले असून शेतातून गोल फिरत पुन्हा रस्त्याच्या कडेला येऊन ठेपले आहे, सदर घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे, त्यांना तात्काळ इतर प्रवाशी व लासगाव गावातील मदतीसाठी धावत आलेल्या नागरिकांनी जळगावच्या दिशेने रुग्णालयात रवाना केले. तर वाहनाची ओळख पटू शकलेली नाही.