विसरूनी सारी कटूता नात्यात तिळगुळाचा गोडवा आला,
एकमेकाच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगला..“
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लाडगाव येथे मकर संक्रांति निमित्त सौभाग्याचे लेणं हळदी कुंकू समारंभ तसेच महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास प्रचंड मोठ्या संख्येने महिला पालक उपस्थित होत्या तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका, महिला बचत गट अध्यक्ष व सदस्य ,तसेच केंद्रातील सर्व महिला शिक्षिका व प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान लाडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. ठाकरे सर यांनी स्वीकारले, तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. मनीष जी दिवेकर साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती वैजापूर ह्या कार्यक्रमास लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जोशी मॅडम यांनी केले, तर प्रास्ताविक लाडगाव केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री. जमील मन्सूरी सर यांनी केले .माता पालकांची भूमिका या ठिकाणी त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली. यानंतर आरोग्य विभागातील जाधव मॅडम यांनी मुले व महिला यांच्या मानसिक शारीरिक आरोग्य व स्वच्छता या संदर्भात माहिती दिली. वीरगाव केंद्रातील श्रीमती निकुंभ मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढी संदर्भात मार्गदर्शन केले, तर पोस्ट ऑफिस कर्मचारी श्रीमती आरती चाळके यांनी आर्थिक बचत यासंबंधी माहिती दिली व उमेद बचत गटाच्या संसाधन व्यक्ती श्रीमती कोमलताई निंबाळकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच न्यू हायस्कूल शाळेचे अध्यक्ष श्री. सत्यजित पाटील सोमवंशी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय श्री. मनीष जी दिवेकर साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती वैजापूर यांनी सर्वांना मोलाचे असे मार्गदर्शन केले,आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेतल्याबद्दल केंद्र लाडगाव टीमचे अभिनंदन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री.ठाकरे सर (केंद्रप्रमुख लाडगाव )यांनी आपले विचार सर्वांसमोर मांडले, त्यानंतर श्रीमती सोनवणे मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय मुख्याध्यापक श्री. मन्सूरी सर ,श्री. नवगिरे सर, श्री. घोडे सर, श्रीमती रिठ्ठे मॅडम,श्रीमती सोनवणे मॅडम, श्रीमती जोशी मॅडम ,श्रीमती भांगरे मॅडम ,तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रामेश्वर पाटील जाधव व सदस्य श्री. रवींद्र सोमवंशी लाडगाव आदींनी विशेष परिश्रम घेतले.