मिरजकरांची आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी सेवाभावी वृत्ती; मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने यंदा सुरू केला वारकरी सेवेचा नवा अध्याय
२५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढ महिन्यातील एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठूमाऊलीच्या दर्शनासाठी विविध ठिकाणाहून लाखो वारकरी पंढरपूर येथे पायी जात असतात. कोल्हापूर सांगली तसेच कर्नाटकातील अनेक वारकरी दिंड्या मिरज मार्गे पंढरपूर गावी प्रस्थान करत असतात. श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाला भेटण्यासाठी या दिंड्यांमध्ये सहभागी असलेले वारकरी हे आतुरलेले असतात. तर मिरजेतील काही सामाजिक संस्था या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आतुरलेले असतात. मिरजेतील माउली प्रतिष्ठान असेच एक नाव जे गेली १३ वर्षे या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सहभागी होत असते. आज या माऊली प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सेवाभावी वृत्ती असणाऱ्या व्यक्ती वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सहभागी झाले आहेत. मिरज पंढरपूर रस्त्यावरील शासकीय रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस वारकऱ्यांचे स्वागत या मंडळींकडून होत आहे. तर या मध्ये वारकऱ्यांच्या चहा नाष्टयापासून त्याचे पाय चेपण्याची सेवा देखील या माऊली प्रतिष्ठान ने गेली १३ वर्षे जोपासली आहे. आजही तितक्याच उत्साहामध्ये माऊली प्रतिष्ठान चे पदाधिकारी आणि सेवेकरी वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत आहेत.
Leave a Reply