Advertisement

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; ठोसेघर सह पाटण तालुक्यातील मुख्य धबधबे प्रवाहित

सातारा जिल्ह्यात मान्सून च्या सरींनी आता जोर धरला असून पावसाने गेल्या दोन दिवसात जोरदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यातील महाबळेश्वर पाटण जावळी वाई कराड तालुक्यातील डोंगरदऱ्यांनी हिरवीगार शाल पांघरली आहे. सातारा शहरापासून जवळ असणारा ठोसेघर घबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे तर पर्यटकांचे नेहमी आकर्षण असलेला पाटण तालुक्यातील वझर्डे  धबधबा ओसंडून वाहत आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील इतर धबधबे सुद्धा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची सह्याद्रीच्या डोंगररांगाकडे गर्दी वाढली आहे. हवामान खात्याने जिल्ह्यातील घाट क्षेत्रामध्ये ५ जुलै पर्यंत ऑरेंज आणि रविवारी रेड अलर्ट दिल्याने प्रशासन सतर्क आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात बुधवार पासून मान्सून चे जोरदार आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. सांगली मिरजेतही गुरुवारपासून जोरदार पावसाने बॅटिंग सुरु केली आहे. मात्र अद्याप सांगली मध्ये नदीपात्र कोरडे आहे तर मिरज तालुक्यातील भोसे तलावही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.          

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!