प्रतिनिधी सुधीर गोखले
चालू वर्षापासून महापालिकेकडून भांडवली मूल्यावर आधारित नवीन मालमत्ता कर प्रणाली लागू करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर होणारा परिणाम, कर आकारणीतील पारदर्शकता तसेच करदात्यांच्या अडचणी याबाबत आज खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेस नगरसेवकांसह मनपा आयुक्त संजीता मोहपात्रा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी शहरातील प्रलंबित विकासकामे, मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांबाबतही विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी संवाद साधला. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत विकासकामांना योग्य ती गती मिळावी आणि नव्या करप्रणालीबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपायुक्त अश्विनी पाटील, विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश नाईक नगरसेविका ऍड बिल्किस शेख बुजरूक, यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक उपस्थित होते.
Leave a Reply