Advertisement

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम : उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम : उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!

सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन


दिनांक 7 मार्च 2026 सोलापूर येथील श्राविका संस्था नगर स्थित उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळे तर प्रमुखअतिथी म्हणून प्रशालेच्या वरिष्ठ दीप्ती शहा, प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका व सांस्कृतिक विभागप्रमुख माधवी खोत यांची उपस्थिती होती.


प्रारंभी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संस्थेच्या संस्थापिका पद्मश्री पंडिता सुमतीबाई शहा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली मान्यवरांच्या हस्तेअर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रशालेतील शिक्षिका पल्लवी खांडवे व सोनाली उंडे यांनी सुमधुर अशा स्वागत गीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्राचार्य मोहोळे यांनी महिला दिनाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगून संस्थेच्या संस्थापिका राजुलमती माताजी व सुमतीबाई शहा, प्रशालेच्या प्रथम मुख्याध्यापिका विद्युल्लता शहा यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेत आपण कार्यरत आहोत याचा अभिमान असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. संस्थेच्या संचालिका अंजली शहा, सुहासिनी शहा, देवई शहा व दीप्ती शहा यांच्या कार्याचीही त्यांनी प्रशंसा केली.
याप्रसंगी महाविद्यालयातील सहशिक्षिका प्रतिभा कंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून महिलांचे कुटुंब व समाजाच्या सर्व क्षेत्रातील महत्त्व सांगितले. माधवी खोत यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या कार्याचा गौरव करून महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समाजात मानसन्मान प्राप्त व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रशालेतील रामेश्वरी बंडगर व श्रद्धा कांबळे,मस्के या विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी गणित संबोध परीक्षा, ऑलंपियाड स्पर्धा, इन्स्पायर ॲवॉर्ड माझा शिवबा निबंध स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रशालेतीतील सर्व महिला शिक्षिका व कर्मचारी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन गणेश लेंगरे यांनी तर आभार सोमनाथ राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!