Advertisement

सोलापूर जिल्हा रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया धारकांना आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 300 जणांना अल्पोउपहारचे वाटप करण्यात आले

सोलापूर जिल्हा रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया धारकांना आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 300 जणांना अल्पोउपहारचे वाटप करण्यात आले
गरजू रुग्णांना “आस्थाचा” नियमित मदतीचा हात”

सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन


दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान रोटरी क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून आज पहिल्याच दिवशी 300 नेत्र रुग्णांची नोंदणी झाली आहे या रुग्णांना व नातेवाईकांना सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत फळे व अल्पोउपहाराचे वाटप करण्यात आले व तसेच पुढील दोन्ही दिवशी सकाळी नाष्टा दुपारचे जेवण व सायंकाळचे जेवणाची सोय करण्यात येणार आहे.

आर्थिकदृष्ट्या गरीब आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना असता सामाजिक संस्थेने अल्पोउपहार वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या पुढील दोन दिवसात हजारोच्या संख्येने रुग्ण येण्याची शक्यता आहे त्यांचे देखील आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दोन दिवस नाष्टा व जेवणाची सोय करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी (, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी) भालचंद्र राठी (रोटरी क्लबचे अध्यक्ष), रोहन भुतडा ( सचिव) विक्रम बेडबार, प्रमोद देशपांडे, डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी (निवासी वैद्यकीय अधिकारी) डॉक्टर वर्षा डोईफोडे (जिल्हा आरोग्य अधिकारी) डॉक्टर संतोष नवले, डॉक्टर भगवान पवार, आनंद तालिकोटी (अध्यक्ष आस्था सामाजिक संस्था) योगेश कुंदुर ( संचालक) वेदांत तालिकोटी (संचालक) पिंटू कस्तुरे, यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की समाजातील गोरगरीब गरजू नागरिक अनेक समस्यांना तोंड देतात त्यातच आजारामुळे ते खचले जातात अशा नागरिकांना मोफत आहार व जेवणाची सोय आम्ही करून सामाजिक ऋण फेडण्यासाठी खारीचा वाटा असता सामाजिक संस्था उचलत आहे या कार्यात मदतीचा हात देऊन आपणही यामध्ये सहभागी होऊ शकता

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!