Advertisement

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगावचा अनोखा उपक्रम बालपण जगूया चला खेळूया -हैप्पी स्ट्रीट खेळ महोत्सव जोरदार संपन्न

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगावचा अनोखा उपक्रम बालपण जगूया चला खेळूया -हैप्पी स्ट्रीट खेळ महोत्सव जोरदार संपन्न

ब्युरो चीप : चेतन सरोदे पाचोरा 

पाचोरा :  रोटरी क्लब पाचोरा भडगाव आपल्या नवनवीन उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. त्याच अनुषंगाने हैप्पी स्ट्रीट खेळ महोत्सव यामध्ये बालपणी खेळले जाणारे पारंपरिक खेळ त्यामध्ये लगोरी,गोट्या,रस्सीखेच,टायर खेळणे,मानवी सापसिढी,भवरा,विट्टी दांडू,मामाचे पत्र हरवले,महारांगोळी असे खेळप्रकार पाचोरा भडगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वं स्त्री पुरुष वर्ग जसे बचपण से लेके पचपन तक यासाठी मोफत आयोजित केला होता. या खेळा बालपण जगा आणि मोबाईल सोशल मीडिया पासून थोडा वेळ का होईना पण दूर ठेवण्यासाठी व आपल्या पारंपरिक खेळ समजण्यासाठी अनोखे नियोजन रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी केले होते. त्यासाठी पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन,पाचोरा पोलीस स्टेशन,जेसीआय पाचोरा,रोट्रॅक्ट क्लब पाचोरा भडगाव,अनेक शिक्षक संघटना यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रमुख अतिथी पी आय राहुल पवारसाहेब, पाचोरा रोटरी क्लब अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी,रोटरी क्लब पाचोरा भडगाव सदस्य डॉ अमोल जाधव,डॉ गोरख महाजन,डॉ अतुल पाटील,डॉ प्रशांत सांगडे,डॉ कुणाल पाटील,डॉ राहुल काटकर,डॉ सिद्धांत तेली,रावसाहेब पाटील,डॉ घनश्याम चौधरी,संजय कोतकर,डॉ अंकुर झवर,डॉ विशाल पाटील,डॉ स्वप्नील पाटील,डॉ पंकज शिंदे,डॉ शिवाजी शिंदे, चिंतामण पाटील,नितीन जमदाडे,नितीन तायडे,शैलेश कुलकर्णी,पिंकी जिनोदिया,ज्ञानेश्वर पाचोळे यासोबत पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन चेयरमन डॉ जीवन पाटील,उपाध्यक्ष डॉ विजय जाधव,सदस्य डॉ नंदकिशोर पिंगळे,डॉ प्रवीण माळी,डॉ दीपक चौधरी,डॉ दिनेश माळी,डॉ वैभव सूर्यवंशी,डॉ भूषण महाजन,डॉ पंकज जाधव,डॉ विजय पाटील,डॉ गेडाम,डॉ अनुप महालपुरे,डॉ प्रतिभा तेली,सौ चारू तेली,सी एन चौधरी सर,विसपुते सर,निर्मल इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य गणेश राजपूत सर,प्रा माणिक पाटील,पाचोरा पोलीस स्टेशनचे पदाधिकारी व कर्मचारी यासोबत अनेक मान्यवर शिक्षक बंधू उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन प्रताप पांडे सर,विजय ठाकूर सर, योगेश वाणी सर यांनी तर स्पर्धा समन्वयक म्हणून गिरीश पाटील सर,राजेंद्र पाटील सर,भावेश अहिरराव सर,सुशांत जाधव सर,कृष्णा साळुंखे सर,वाल्मिक पाटील सर,निवृत्ती तांदळे सर,स्वप्नील बागुल सर,अभिषेक भावसार सर,महेश रोकडे सर,समाधान पाटील सर,स्वप्नील माने सर,वासुदेव चव्हाण सर,राजेंद्र पिंपळसे सर यांनी काम बघितले.कलाछंद आर्ट टीम यांनी रोटरीची या वर्षी ची थीम यांची रांगोळी काढून वर्ल्ड रेकॉर्ड साठी पाठवली आहे.यातील मुख्य कलाकार शैलेश कुलकर्णी, सहकलाकार उन्नती पाटील,देवश्री कासार,स्वरा रानडे,वैष्णवी पाटील,श्रुती सोनकुळे,सत्यजीत पाटील,साई कोळी,ओमकार केंदळे,किर्तीकुमार सोनवणे,निरज जोशी,ओम सोनकुळे,देवांगिनी मोकाशी,अमन कुमार शाह,विद्या कोतकर,डॉ प्रतिभा तेली,पिंकी जिनोदिया,निधी नैनाव या सर्वांनी मिळून रांगोळी काढली. या रांगोळी रेखाटण्यासाठी लागलेला वेळ सलग ९ तास,एकूण कलाकार २०,लागलेली एकूण रांगोळी ५५० किलो,महारांगोळी आकार- १४५० चौ फूट अशी हि भव्य दिव्य रांगोळी मुख्य आकर्षण ठरली. या रांगोळी भवती मानवी साखळी बनवून सर्वांनी युनाईट फॉर गुड असा एकतेचा संदेश यातून दिला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!