जगदीश जाधव पाटील
प्रतिनिधी
भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश चे उद्या लातूर येथे विभागीय बैठक

भारतीय किसान युनियन भारतातील एक मोठी शेतकरी संघटना असून श्री राकेश जी टीकेत ह्यांच्या देश व्यापी आंदोलनामुळे शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी भाग पडले होते, आज घडीला त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणारे अन्याय लक्ष्यात घेता महाराष्ट्रात संघटन बांधणी सुरू केली असून त्यांनी दिलेल्या आदेशनुसार महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी जोमाने कामाला लागली असून येत्या २० जानेवारी २०२५ रोजी pvr चौक रिंग रोड लातूर येथे मराठवाडा विभागीय बैठक आयोजित केली आहे.
बैठकीला प्रमुख म्हणून प्रदेश प्रभारी भाई चंद्रशेखर नलावडे पाटील, प्रदेश महासचिव सौ मावळा रुपाली ताई पाटील उपस्थित राहणार असून बैठकांचे नियोजन विभागीय प्रभारी भाई नेहरू देशमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे, सदरील बैठकीस राज्य कार्यकारिणी सदस्य,मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष,सदस्य उपस्थित राहणार आहेत
तरी सर्व शेतकरी बांधव आणि सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यव्यापी संघटन बांधणी व सदस्य नोंदणी आणि शेतकरी हितासाठी करावे लागणारे आंदोलन ह्या कार्यास सुरुवात होईल


















Leave a Reply