अखेर त्या शेतकऱ्यांमध्ये जल्लोष आमरण उपोषणाला यश सत्यार्थी न्यूज चा इफेक्ट
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
सत्यार्थी न्यूज चॅनलच्या संचालिका मानसी मॅडम यांचे खूप खूप आभार व धन्यवाद शेतकऱ्यांनी मानले आमच्यासारख्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिल्याबद्दल मानसी मॅडम चे खूप खूप धन्यवाद.
नांदूरढोक बाबुळगावगंगा, पुरणगाव, हिंगोणी, कांगोणी येथील 8 नंबर चारी वरील टेलच्या शेतकऱ्यांना 10 वर्षानंतर नांदूर मधमेश्वर कालव्याचे सन्मानाने पाणी मिळाले, पाणी मिळवण्यासाठी आधार शेतकरी जलदूत समितीचे सर्कल प्रमुख श्री कृष्णा भाऊ कुंजीर व त्यांचे सहकारी यांनी चार दिवस आमरण उपोषण चारी नंबर 8 वर केले. ना.म.का.विभागाच्या शाखा अभियंता श्रीमती अश्विनी मांडारकर मॅडम यांनी उपोषण कर्ते श्री कृष्णा भाऊ कुंजीर व त्यांचे सहकारी यांच्याशी चर्चा करून यापुढे प्रत्येक आवर्तनात अशाच पद्धतीने टेल टू हेड पाणी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले व त्यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले यावेळी आधार शेतकरी जलदूत समितीचे अध्यक्ष श्री पंडित अण्णा शिंदे , शाखा अभियंता श्री चने साहेब, सह शाखा अभियंता श्रीमती दाभाडे मॅडम, अडव्हकेट श्री प्रदिप चंदने , श्री काकासाहेब चंदने, श्री नवनाथ आप्पासाहेब ठोंबरे, श्री निवृत्ती पाबळे , श्री नवनाथ पाटीलबा ठोंबरे, श्री गोकुळ वराडे, श्री भावराव घंगाळे, श्री नानासाहेब बोठे, श्री नवनाथ घंगाळे, श्री नारायण घोडे, श्री विनायक बाबा गाढे, श्री संजय गायधने, श्री विजय कुंजीर,उपअध्यक्ष श्री कृष्णा पाटील सर, संपर्क प्रमुख श्री सोन्याबापू शिरसाठ, प्रसिद्ध प्रमुख रामेश्वर निंबाळकर, वैजापूर विभाग प्रमुख श्री संदीप रक्कटाटे, श्री परसराम नरोडे, श्री सोमनाथ खटाणे,श्री रवि सोमवंशी,आदी शेतकरी उपस्थित होते.🙏🙏💐💐💐