प्रतिनिधी- तुषार मारुती केंगार
रिपोर्टर ,
सोलापूर जिल्हा
शाहीरी कलेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी वारीमध्ये महाराष्ट्र शासनाचा लोककलेचा रथ
आज रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले असून , पालखीचा आजचा मुक्काम हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते या गावामध्ये आहे , पालखीच्या स्वागतासाठी तालुक्यातील नागरिकांची- वारकरी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती , त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी शासनाने सुरु केलेले लोककलेचे विविध सांस्कृतिक रथ मोठ्या प्रमाणावर लोकांची जनजागृती करताना पाहायला मिळाले , शिवशाहीर यशवंत सुरेश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी वारकरी भाविकांची जनजागृती करत विविध योजनांची व शिंदे सरकारने केलेल्या कामांचे अवलोकन व उजळणी करून दिली.