मिरज शहरात दहशत माजविणाऱ्या पिट्या भोरे गॅंग वर संघटित जिन्हेगारी कलम अन्वये कारवाईचे पोलीस अधिकक्षकांचे निर्देश; मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले यांची माहिती
प्रतिनिधी सुधीर गोखले
मिरज शहर आणि परिसरात दहशत माजविणाऱ्या कमानवेस परिसरातील पिट्या राहुल भोरे (वय २० रा कमानवेस) याच्या सह ध्रुव राहुल भोरे(वय २३ रा कमानवेस) प्रथमेश स्वरूप तांदळे (वय २९ रा कमानवेस) आणि प्रवीण विनोद मोरे (वय २० रा अष्टविनायक नगर डी मार्ट च्या मागे पंढरपूर रस्ता मिरज) यांच्यावर मिरज शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कलमांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांनी हि कारवाई केली आहे. वरील सर्व संशयित हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हे दाखल आहेत. या संशयितांनी संघटितपणे एका व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले होते. या सर्वांचे रेकॉर्ड पाहिल्यावर त्यांच्या कारवाया या संघटित गुन्हेगारी व्याख्येत बसत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले त्यामुळे मिरज शहर पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलाम १११ अन्वये कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे कारवाई साठी प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी यासर्व संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे मिरज शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अपाय होणाऱ्या शहराची शांतात बिघडवणाऱ्या आणि कायदा हाती घेणाऱ्या अशा टोळ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी स्पष्ट केले आहे.
Leave a Reply