सत्यार्थ न्युज प्रतिनिधी – किरण माळी
धरणगाव प्रतिनिधी / जांभोरा येथील शेतकरी गोपाळ केशव अहिरे वय वर्ष 70 हे दि.31/10/2024 सायंकाळी 5:30 च्या सुमारास आपल्या दिवसभराचं शेतातील काम आपटून घरी परत जात असताना वाहन चालक अय्युब पिंजारी एसटी बस क्रमांक MH20BL3363 ने बैलगाड्याला जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की 
गोपाळ अहिरे हे गंभीर जखमी झाले व दोन बैले जागीच ठार झाले. गोपाळ अहिरे यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी अहिरे यांना मृत घोषित केले झालेल्या घटनेच्या तपास पोलीस प्रशासन करत आहे. गोपाळ अहिरे यांना न्याय मिळावा अशी परिवाराची मागणी आहे व घडलेल्या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी अहिरे कुटुंबाची मागणी आहे. गोपाल अहिरे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले जगदीश अहिरे,सुरेश अहिरे दोन सुना चार नातवंड असा परिवार आहे.

















Leave a Reply