Advertisement

चाळीसगाव :- अवैधरित्या गांजा विकणाऱ्या इसमावर केली चाळीसगाव पोलिसांनी कारवाई

चाळीसगाव :- अवैधरित्या गांजा विकणाऱ्या इसमावर केली चाळीसगाव पोलिसांनी कारवाई

चाळीसगाव :- शहर पोलिसांनी अशोक भरतसिंग पाटील वय 54 वर्षे धंदा- ड्रायव्हर रा. प्लॉट नं.38, शिक्षक कॉलनी, चाळीसगांव हा चाळीसगांव शहरामध्ये अवैध रित्या गांजा विक्री करित असल्याबाबत माहीती मिळाल्याने मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्रीमती कविता नरकर (पवार) यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे तसेच मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांची परवानगी घेवुन आम्ही पोलीस निरीक्षक, संदिप पाटील तसेचश्री जितेंद्र धनराळे, निवासी नायब तहसिलदार,चाळीसगांव, पोउनि/सुहास आव्हाड, पोहेकॉ/1119 सुभाष घोडेस्वार, पोहेकॉ/1720 राहुल भिमराव सोनवणे, पोहेकॉ/2897 विनोद विठ्ठल भोई, पोना/3136 महेंद्र प्रकाश पाटील पोकॉ/208 आशुतोष दिलीप सोनवणे, पोकॉ/552 ज्ञानेश्वर हरी पाटोळे, पोकाँ/3363 पवन कृष्णा पाटील, पोकाँ/1419 विजय रमेश पाटील, पोकाँ/988 ज्ञानेश्वर विलास गिते, पोकाँ/1808 मनोज मोरसिंग चव्हाण, पोकॉ/2400 राकेश मुरलीधर महाजन, पोकॉ/2545 रविंद्र निंबा बच्छे, म.पो.शि.3279 स्नेहल मांडोळे, सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे.तसेच फोटोग्राफर अनिकेत जाधव, वजन माप करणारे श्री प्रविण जगन्नाथ वाणी, रा. चाळीसगांव यांच्यासह बातमीतील इसमास सुमारे 10,06,300/- रुपये किमतीच्या 50 किलो 315 ग्रॅम गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण 22,06,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द दिनांक 16/06/2024 रोजी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक, सुहास आव्हाड व पोकॉ/उज्वलकुमार म्हस्के नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!