वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ….. शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

लाडगाव कापूस वाडगाव परिसरामध्ये व पंचक्रोशी मध्ये सध्या बिबट्याचा वावर वाढला असून रात्री लाडगाव मधील जयराम ज्ञानेश्वर पोटे व नारायण पंढरीनाथ सोमवंशी दोन शेतकऱ्यांच्या पशुधनाचे बिबट्याने शिकार केली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आले यावेळी वनविभागाचे अधिकारी आसमा सय्यद या घटनास्थळी उपस्थित होत्या त्यांनी सांगितले आम्ही या ठिकाणी पिंजरा लावून वनविभाग मार्फत बिबट्याला पिंजरा लावून जेर बंद करण्यासाठी उपाययोजना करत आहे व परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी लहान मुलांना एकटे सोडू नका शेतात काम करणारे मजुरांनी सावधानता बाळगावी व आवाजाचे उपकरण वापरावे असे आसमा सय्यद यांनी सांगितले आहे तसेच परिसरातील काही नागरिकांनी शेतकऱ्यांना रात्रीची विज असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी भरताना बिबट्या दिसत असून शेतकरी भयभीत होत असून शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंपासाठी वीज देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यासह पोलीस पाटील वाडेकर व शेतकरी शिवाजी रक्ताटे रामेश्वर निंबाळकर उपस्थित होते.


















Leave a Reply