पाचोरा : पाचोरा पोलीस स्टेशन व रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी कार्यक्रम

पाचोरा : जळगाव जिल्हा पोलीस दल, पाचोरा पोलीस स्टेशन, रोटरी क्लब पाचोरा भडगाव, पत्रकार बांधव, समाजसेवी संस्था यांच्याकडून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस रन फॉर युनिटी हा कार्यक्रम घेण्यात आला. यनिमित्त 3 किमी पळून सर्वांनी आपला सहभाग नोंदवला. पाचोरा पोलीस स्टेशन पी आय राहुल पवार, सोबत पाचोरा पोलीस स्टेशन पदाधिकारी योगेश गणगे, कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, संजय निकुंभ, सुनील पाटील व अशोक पाटील, पांडुरंग सोनवणे, अजयसिंग राजपूत,तहसीलदार बनसोडे, नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे,रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली, रोटरी सदस्य डॉ राहुल काटकर, चंद्रकांत लोढाया, स्वप्नील धनराळे, डॉ शिवाजी शिंदे, संजय कोतकर, डॉ घनश्याम चौधरी, डॉ गोरख महाजन, पिंकी जिनोदिया, डॉ प्रशांत सांगडे,रोट्रॅक्ट क्लब सदस्य चेतन सरोदे, पुंडलिक पाटील, लक्ष्मण जाधव यासोबत पोलीस बांधव भगिनीं तसेच पोलीस भरती तयारी करणारे सर्वं विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा अमूल्य सहभाग होता. कार्यक्रमानंतर सर्वाना अल्पोपहार देण्यात आला. परिसरातील नागरिकांकडून या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.

















Leave a Reply