पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांचेकडून जागतिक पोलिओ निर्मूलन दिन साजरा

24 ऑक्टोबर हा दिवस जागतिक पोलिओ निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे पोलिओ बद्दल जनजागृती या अनुषंगाने पोलिओ नायनाट हा कार्यक्रम घेतला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ सतीश टाक, वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंके, डॉ विजय पाटील, डॉ अक्षय सोनवणे, डॉ पंकज नानकर, डॉ इम्रान शेख, डॉ अनुपमा भावसार या सर्वांचा पोलिओ निर्मूलन बद्द्ल सत्कार करन्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, रोटरी सदस्य डॉ घनश्याम चौधरी, डॉ गोरख महाजन, चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, चिंतामण पाटील, संजय कोतकर, रावसाहेब पाटील,शैलेश कुलकर्णी, नितीन तायडे,रोट्रॅक्ट क्लबचे पदाधिकारी व सदस्य नेत्रज ढाकरे, मानव सालोमन,प्रथमेश ढाकरे, अमन सर,अथर्व सरताळे,लक्ष्मण जाधव,पुंडलिक पाटील,चेतन सरोदे यासमवेत ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ उपस्थित होता. यावेळी संजय कोतकर व रोटरी क्लब अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी पोलिओ निर्मूलनात रोटरी च्या सहभागाचे आवर्जून कौतुक केले.पोलिओ डोसचे दोन थेंब आपल्याला पोलिओ सारख्या भयंकर आजारापासून वाचवू शकतात.त्या ओरल पोलिओ डोसमुळे आज संपूर्ण जग जवळपास पोलिओ मुक्त झाल्यासारखे आहे.अशी माहिती यावेळी देण्यात आली.
















Leave a Reply