वैजापूर तालुक्यात 14 गावांना कर्जमाफी मिळवून शेतकऱ्यांचा सातबारा केला कोरा…. आमदार रमेश बोरनारे
. प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

श्री रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत 14 गावांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा करून शासन निर्णयानुसार संस्थेस 63 कोटी 67 लाख रुपयेचा धनादेश वितरित झाला व त्यामुळे 14 गावातील बळीराजांचे सातबारे कोरे झाले. याच पार्श्वभूमीवर पालखेड गावातील शेतकरी बांधवांनी आमदार बोरणारे यांचा नागरिक सत्कार आयोजित केला. या सोहळ्यास उपस्थित राहून काही शेतकऱ्यांना कोरे झालेले सातबारे प्रत्यक्ष वाटप करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान लाभले. गावकऱ्यांच्या सन्मानाचा आदरपूर्वक स्वीकार करून आमदारांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत 500 असंघटित कामगार महिलांना गृहउपयोगी भांडी संचाचे वाटप करण्यात आले. गावातील असंघटित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख 10 हजार रुपये शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, मा नगराध्यक्ष श्री साबेरभाई,

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.बाबासाहेब पा जगताप, कृ.उ.बा.समिती सभापती रामहरी बापू जाधव, श्री.सुभाष काका तांबे, श्री.कचरू अण्णा डिके, मा.सभापती अंकुश पा हिंगे, जिल्हा समन्वयक बाळासाहेब पा चव्हाण, तालुकाप्रमुख अनिल पा चव्हाण, ह.भ.प कडूबाळ महाराज गवांदे, युवासेना जिल्हाप्रमुख भरत पा कदम, तालुका समन्वयक सुनील पा पोळ, मा.उपसभापती श्री.राजेंद्र पा चव्हाण, श्री.आनंद निकम सर, उपतालुकाप्रमुख पी एस पा कदम, संचालक संभाजी पा जगताप, गोरख पा आहेर, तालुका समन्वयक गणेश पा निकोले, प्रशांत पा शिंदे, श्री सुरेश भाऊ पानसरे, अंबादास मामा खोसे, श्री.संभाजी पा डुकरे, श्री.राजेंद्र पा चव्हाण, मा.पं.स.सदस्य बद्रीनाथ पा चव्हाण प्रमुख पदाधिकारी व पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते


















Leave a Reply